नांदेड| शनिवारी संपन्न झालेल्या महालोक अदालतीच्या वेळी न्यायाधिशाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत एका वकिलाने कोर्टापुढे आपल्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना शनिवार दि.११ वाजेच्या सुमारास घडली असून, ऍड. जयपाल मधुकर ढवळे असे वकिलाचे नाव आहे.
दि.१२ मार्च शनिवारी रोजी नांदेड जिल्हा न्यायालय परिसरात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालत सुरु झाल्यानंतर अंदाजे ११ वाजेच्या सुमारास ऍड. जयपाल मधुकर ढवळे हे न्यायालयाच्या मुख्यद्वारावर आले आणि त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वजिराबाद पोलीसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम ३०९ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.