सदरील मंदिराचे एकतीस फूट उंच शिखराचे बांधकाम करण्यात आले असून दिनाक २६ रोजी कलशारोहण करण्यात येणार आहे. त्याआधी दिनाक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता ह. भ. प. सुरेश महाराज पोफाळीकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.तसेच दिनाक २६ रोजी सकाळी शहरातून कलशाची मिरवणूक काढण्यात येणार असून अनेक संतांच्या उपस्थितीमध्ये कलशारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ६ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील मंदिराची रंगरंगोटी करून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तेंव्हा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वसंतराव गंधेवार, दिगांबरराव दमकोंडवार,राजू पांडे, उमाकांत माळोदे,दिपक पोगरे, उमाकांत भोरे, श्रीनिवास दमकोंडवार, बालाजी घळाप्पा, बालाजी शंकुरवार,
सचिन सूर्यवंशी,प्रविण गंधेवार,विशाल सोनूने,लखन सबरवाड,संदीप सोनुने, विशाल सोनुने, प्रसाद बाभळे, किरण बोरकर, प्रदीप सोनुने, विकास डोरले, बालाजी महाजन, हर्षद सोनूने, कृष्णा पेनेवाड,तुकाराम वानखेडे, शिवा पोगरे,भाऊराव लकडे, गणेश सोनुने, राहुल व्यवहारे, सचिन पोटेकर, सतिश शिंदे, दत्तराव जगताप,राहुल बिरदाळे,विणकरे मामा आदीनी केले आहे.