नांदेड| जिल्ह्यातील ज़िल्हा परिषदेच्या शाळांतील शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार जवळा [दे ] येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किशनराव गच्चे यांची तर उपाध्यक्षपदी चांदोबा झिंझाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस, सरपंच साहेबराव शिखरे, से. स. सोसायटीचे व्हा. चेअरमन कैलासराव मोरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आकाशवाणीचे निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, अतुल गोडबोले, मिलिंद गोडबोले, अमोल गोडबोले, बालाजी झिंझाडे, बालाजी पांचाळ, अनिल गवारे, बाबासाहेब शिखरे, गंगाधर शिखरे, गुणवंत गच्चे, ग्यानबा गोडबोले, नूरजहाँ पठाण, हैदर शेख, संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार आदिची उपस्थिती होती.
पालक सभा घेऊन निवड करण्यात आलेल्या शालेय समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष- किशनराव गच्चे, उपाध्यक्ष- चांदोबा झिंझाडे, ग्राम पंचायत सदस्य- शोभाताई वसंत गोडबोले, शिक्षण तज्ञ - डॉ.सुजाता ग्यानोबा गोडबोले, सदस्य- प्रतिभा गोडबोले, आनंद पी. गोडबोले, बाबूमियाँ शेख, संतोष मठपती, मनीषा गच्चे, वंदना शिखरे, प्रियांका शिखरे, सखुबाई चक्रधर, मीनाताई पांचाळ आदींचा समावेश आहे.