नांदेड| २३ मार्च, २०२२ रोजी बुधवार या दिवशी पोलीस अधिक्षक कार्यालयात ”शहीद दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, यांचे हस्ते ”शहीद भगतसिंघ, राजगुरू, आणि सुखदेव ” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी द्वाकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, श्रीमतीशिंदे, सपोनि पोलीसनियंत्रण कक्ष नांदेड, ठाकुर,पोउपनि जलद प्रतिसाद पथकइतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रम पाडण्या करीता सपोउपनि उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे,पोकॉ विनोद भंडारे यांनी परिश्रम घेतले.
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये शहीद दिनानिमित्त अभिवादन - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे, मानव्य विद्या शाखेचे अधिष्टता डॉ अजय टेंगसे, एन एस एस संचालक डॉ शिवराज बोकडे, दूर शिक्षण संचालक डॉ रमजान मुलानी, प्रा केशव सखाराम देशमुख, अधिसभा सदस्य उद्धव हंबर्डे, उपकुलसचिव डॉ श्रीकांत अंधारे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, उप वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रवी मोहरीर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.