या वर्षी 'समता वारी' निमंत्रक सचिन पाटील व सहकारी यांनी असे ठरविले की,राज्यातील समतेचे प्रतीक असलेल्या विविध केंद्रांवर भेट देत क्रांतिकारी स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी विविध जिल्ह्यातील स्मृतिस्थळी भेट देऊन तेथील पराक्रमाला नतमस्तक/अभिवादन करत हा "समता वारी' अहवाल अर्पित करण्यासाठी प्रवास सुरू केला आहे.
यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टेम्भुर्णी गावातील शहिद पोचिराम कांबळे यांच्या स्मृतीस्थळी भेट देत 'समता वारी' अहवाल क्रांतिकारास अर्पित केला. शहिद पोचिराम कांबळे हे विद्यापीठ नामांतर लढ्यावेळी शहीद झाले होते,त्यांचे बलिदान या राज्यासाठी,देशासाठी बहुमोलाचे असल्याने 'संत चोखामेळा अध्यासन केंद्र' निमंत्रक सचिन पाटील व विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.सुनिल गायकवाड यांनी हा शहीद इतिहास कायम लोकांच्या स्मरणात रहावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ठरविले.
तसेच मा.खा.सुनिल गायकवाड यांनी या स्मृतीस्थळ परिसरात एक सभागृह उभारणीसाठी निधीची तरतूद करून देत भव्य सभागृह उभारणीदेखील करण्यात आली आहे,याच सभागृहात दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास सत्यशोधक संस्थेचे नरसिंगे सर,प्रा.श्रीकांत गायकवाड, मा.गटशिक्षणाधिकारी वाघमारे, बेलके, ऋषिकेश सकनूर,युवा पत्रकार गजानन जोशी,शिवसांब देशमुख,मन्मथ कस्तुरे,भास्करे व नागरिक उपस्थित होते.