नांदेड| अ.भा.क्षेत्रीय महासभा युवा आघाडीचे प्रदेश सचिव महेशसिंह राठौड (वय 40) यांचे अल्पशा आजाराने आज (सोमवार) सकाळी दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार बहिण, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. महेशसिंह राठौड यांच्या पार्थिवावर सायंकाळी रामघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.