माजी उपसरपंच व शालेय समीती अध्यक्ष भिडले
मालेगाव, शुभाशीष कामेवार| नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये फ्री स्टाईल हानामारी झाली असून, माजी उपसरपंच व शालेय समीती अध्यक्ष एकमेकांविरुद्ध भिडले असल्याचा प्रकार मुखयध्यापकांसमोर घडला आहे. या संदर्भात एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वासंतिक वर्गामुळे राज्य भर प्रसिद्धीस आलेली जि.प.शाळा आत्ता मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मंगळवारी माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे आपला निर्गम उतारा काढण्यासाठी शाळेत गेले असता मुख्याध्यापकांचा कार्यालयात मुख्याध्यापक सूर्यवंशी यांना ते बोलत असताना शालेय समितीचे अध्यक्ष परमेश्वर हिंगोले आणी सिद्धार्थ वाघमारे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला आणी त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
विशेष म्हणजे मुख्याध्यापका समोर हा प्रकार घडला असताना मुख्याध्यापकांनी बघ्याची भूमिका घेतली व त्यांचा स्वतःचा कार्यालयाचा कुस्तीचा आखाडा होऊ दिला. मिळालेल्या माहिती नुसार शाळेमधे शिक्षकांचे दोन गट आहेत. आणी त्या गटांमुळे शाळेत ज्ञानदानाचे कार्य कमी आणी राजकारण ज्यास्त केल्या जाते. त्याचेच परिणाम कालच्या हाणामारीत झाले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हाणामारीचा सर्व प्रकार शाळेतील सिसिटिव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे व शालेय समितीचे अध्यक्ष परमेश्वर यांनी परस्पर विरोधी तक्रार पोलीस स्थानकात देऊन गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास जमादार पप्पु चव्हाण हे करत आहेत.