हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या अनेक महिन्यापासून हिमायतनगर शहरातील पथदिवे बंद असल्याने शहर अंधारात सापडले आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, आता रमजान महिना सुरु होणार आहे. हि बाबा लक्षात घेता तातडीने शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातील पथदिव्याचा वीज पुरवठा सुरळीत करून शहराला अंधारातून उजेडात आणावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सदारखान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हातात आल्यापासन शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यात पाणी टंचाई, स्वच्छता, शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे, मोकाट गुरांचा प्रश्न यासह अनेक समस्यांनी शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. याबाबत अनेकांनी आवाज उठविला मात्र कुंभकर्णी झोपेतील प्रशासक राजकीय नेत्यांच्या हाताची बाहुली बनल्यामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
आता आगामी ३ एपरील पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना चालू होत आहे. या काळात अनेकजणांना रोज- उपवास असतो. त्यामुळे रात्री - बेरात्रीला अंधाराच्या वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. असे असताना देखील महिन्यापूसन शहरातील मुख्य रस्त्यासह प्रभाव क्रमांक १ ते १७ मधील रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. एवढेच नाहीतर शहरात लावण्यात आलेली सौर ऊर्जेचे दिवेही बंद असल्यामुळे शहरात अंधार पसरला आहे. याबाबत माहिती घेतली असतं महावितरण कंपनीची वीजदेयके नगरपंचायतीने अडा केली नसल्याने सर्व पथदिवे बंद असल्याचे सांगण्यात आले आहे.
हि बाब लक्षात घेता आणि शहरात अंधकारमय वातावरण असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ महावितरणची थकबाकी भरून शहरातील पथदिव्याचा वीज पुरवठा रमजान महिना लागण्या अगोदर सुरु करावा तसेच सार्वजनिक बोअरवेल सुद्धा सुरु करून देऊन नागरिकांच्या जिवनावश्यक गरजा सोडविण्यास प्राधान्य देऊन दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सदारखान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी महावितरण, तहसीलदार, नगरपंचायत, आणि संबंधितांना दिल्या आहेत.