नांदेड| पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा 2020 - 22 व समृद्धीच्या वाटेवरील गावांचा सन्मान सोहळा गोविंदराज मंगल कार्यालय, लोहा ता.लोहा येथे आयोजित कार्यक्रमात सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थित पार पडला.
पुढे बोलताना सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर म्हणाल्या की ग्रामीण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करून संपन्न, समृद्ध करण्याचा आपण जो ध्यास घेतला आहे. तो पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास घेऊन जायचा आहे. निर्माण होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीस आपण जबाबदार आहोत पाण्याच्या नियोजनातील निष्काळजीपणा आणि निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राला आज या मानवनिर्मित संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
ही परिस्थिती आपल्यामुळेच उडवली त्यामुळे तिच्यावर उपाय ही आपण शोधला पाहिजे आणि त्याचा उपाय म्हणजे पाणी फाउंडेशन होय सामाजिक एक्य वाढून ग्रामीण पर्यावरण व्यवस्था आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी माहिती आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे म्हणूनच आपणास दुष्काळाकडून समृद्धीकडे जावे लागेल हेच आपले अंतिम उद्दिष्ट असावे. यावेळी सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कंधार, लोहा तालुक्यातील 18 गावांतील सर्व सरपंच उपसरपंच व सर्व जलदूतांना मार्गदर्शन केले. सर्व प्रतिनिधी व जलदुतांचा सन्मान करण्यात आला. सदरील कार्यक्रमास पाणी फाऊंडेशन चे मुख्य मार्गदर्शक डॉ.अविनाश पौळ, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पवार, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक राजाभाऊ कदम, शिवलेश्वर मेदले यांच्यासह तालुक्यातील विविध जलदुत मोठ्या संख्येने उपस्थित होते.