माहूर/नांदेड| (कृषी) पंचायत समिती विस्तार अधिकारी किनवट अतिरिक्त पदभार माहूर राहणार सरस्वती मंदिराजवळ किनवट मूळ राहणार जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यास तडजोडीअंती ७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे पंचायत समिती विभागातील कार्यरत अधिकारी - कर्मचाऱ्याच्या एकाच खळबळ उडाली आहे. एकनाथ घुमटकर वय ४० वर्षे असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शेतात मंजूर झालेल्या विहिरीचे बांधकाम पाहणी करून उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी (कृषी) पंचायत समिती विस्तार अधिकारी एकनाथ घुमटकर वय ४० वर्षे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने दि.२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचे कार्यालयात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पडताळनी केली असता पंचासमक्ष दि.२४ रोजी १० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वतः स्वीकारले आहेत. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने आरोपी लोकसेवक संजय एकनाथ घुमटकर वय ४० वर्षे व्यवसाय नोकरी विस्तार अधिकारी (कृषी )पंचायत समिती किनवट अतिरिक्त पदभार माहूर यास अटक करून ताब्यात घेतले आहे.
सदरील कार्यवाही डॉ. श्री राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, श्री धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांचे मार्गदर्शनखाली सापळा अधिकारी श्री कालिदास ढवळे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड, सापळा पथक सपोउपनि संतोष शेट्टे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना एकनाथ गंगातीर्थ, चापोना शेख मुजीब, यांनी केली आहे.
या कार्यवाहीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरीकांना आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो,स्नेहनगर पोलीस वसाहत नांदेड यांचे @ दुरध्वनी क्रं. ०२४६२-२५३५१२, @ मोबा.क्रं. ७३५०१९७१९७, @ टोल फ्रि क्रं. १०६४ वर संपर्क साधावा.