केंद्र सरकारच्या विकास योजनांची माहिती गाव पातळी पर्यन्त पोहचावी- खा चिखलीकर -NNL


लोहा|
देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशा सह चार राज्यात भाजपची सत्ता आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व तसेच लोकोपयोगी विकास योजना  जनतेत  लोकप्रिय ठरल्या आहेत त्यामुळेच लोकांनी कॉंग्रेसला नाकारले आणि भाजपाला भरभरून मतदान केले आपल्या राज्यातही डब्बल  इंजिनचे सरकार आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन घ्यावी व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील यादृष्टीने आता पासून कामाला लागावे असे मार्गदर्शन जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. कलंबर सर्कलमधील कार्यकर्त्यांचा कौटुंबिक स्नेह संवाद कार्यक्रम नंदिकेश्वर मंदिर, रायवाडी येथे पार पडला. 

जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळो. भाजपा  जिल्हा सरचिटणीस युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते केरबा सावकार बिडवई  माजी नगराध्यक्ष किरण सावकार, सभापती बालाजी पाटील मारतळेकर, पं.स.सभापती आनंद पाटील ढाकणीकर,माजी सभापती बाबूअप्पा मूकनवार तालुकाध्यक्ष शरद पवार, या गटाचे प्रमुख साहेबराव काळे, गट नेते करिम भाई शेख, उपसभापती नरेंद्र गायकवाड, उत्तमराव कोंडलवाडे , किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबाराव पाटील, गवते नगरसेवक भास्कर पवार, उपसभापती , तालुका  उपाध्यक्ष अभंग पाटील गाडेकर , उपसभापती बळी पाटील कदम,  भाजपा चे ज्येष्ठ देविदास गित्ते, गोविंद पा. फाजगे, सुरेश गायकवाड, शाहजी पाटील, प्रविण धुतमल, बाळु पाटील, राम पाटील सिरसाट, पंडीत पाटील फाजगे, विजय पाटील, अभंग  गाडेकर, तिरुपती पाटील, सावंत पाटील, सुमेध गजभारे ,शाहजी राठोड, विठ्ठल सोनकांबळे  यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

खा चिखलीकर यांनी देशाचे पंतप्रधान नारद मोदी यांनी घेतलेली विविध योजनांची माहिती दिली तसेच राज्य सरकार कसे शेतकऱ्यांना वीज तोडणी करून त्रास देते आहे. भ्रष्टाचाराचे आरोप कसे मंत्र्यांवर होताहेत हे सांगताना दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी  केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लोकांना द्यावी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिकण्यासाठी कामाला लागावे असे मार्गदर्शन केले. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्याच्या स्नेह मेळाव्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले जेष्ठ नेते केरबा सावकार बिडवई , सभापती आनंदराव पाटील उपसभापती नरेंद्र गायकवाड, यांची भाषणे झाली या गटाचे  उमेदवार व प्रमुख साहेबराव गुरुजी काळे यांनी प्रास्ताविक केले  मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी