उस्माननगर, माणिक भिसे| भारताच्या स्वातंत्र्यपूर्व पासून ते आजपर्यंत उस्माननगर ता.कंधार येथील शारदा वाचनालय हे परिसरातील वाचकांसाठी शिदोरीची मेजवानी कायमस्वरूपी वरदान ठरणार आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुशिक्षीत नागरिकांना म्हणाले की,शिका, संघटित व्हा, अन् संघर्ष करा असे आवाहन केले आहे.डाॅ.आंबेडकरांनी सर्वाना पुस्तकांची भूक लागली पाहीजे,पुस्तकावर प्रेम करायला शिकले पाहिजे असे मत व्यक्त केले होते.थोर महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून श्री शारदा वाचनालय ( मोठी लाठी) उस्माननगर येथे स्थापन केली.
उस्माननगर परिसरातील गावागावात वाचन संस्कृती जोपासावी, विद्यार्थी, जिज्ञासू लोकांना ज्ञानाची सोय व्हावी, यासाठी स्वातंत्र्य पूर्व १९४२ मध्ये ॲड. ( कै.) कृ. वि. देशमुख, व ॲड. ( कै.) दामोदरराव देशपांडे यांनी पुढ येवून वाचकांसाठी शिदोरी ठेवून दिली.
१९७३ साली शासकीय मान्यता मिळालेले वाचनालयात आज सतरा हजार सहाशेच्या वर विविध प्रकारच्या पुस्तके, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, जुन्या दूर्मिळ ग्रंथ, स्पर्धा परीक्षा संदर्भ ग्रंथ व कथा, कादंबरी, नाट्य, कला, कृषी, आत्मचरित्र, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील समृद्ध ज्ञानाचे विपुल भांडार आहे. अतिशय कष्टाने सांभाळले जाणारे हे वाचनालय गावासह परिसराचे सांस्कृतिक वैभव म्हणून परिचित आहे.
या वाचनालय मधील ज्ञानाचा उपयोग करून अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. अनेक जण आज शासकीय सेवेत उच्च पदावर असून राष्ट्रीय कार्यात अग्रेसर ठरले आहेत. तत्कालीन परिस्थितीत अतिशय कठीण काळात संगोपन करुन वाढवलेले वाचनालय वाचकांची वाचनाची भूक शमविण्यासाठी सक्षमपणे कार्यरत आहे.
वाचनालयाचे विद्यमान संचालक म्हणून माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार, बा. दे. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाचकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या पुस्तकांसह, माहिती, मनोरंजन, थोर पुरुषांची पुस्तके आवर्जून मागविण्यात येतात. बाल वाचकांना उपयोगी पडेल असे भरपूर प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत.
या वैभवशाली वाचनालयात ( कै.) रुक्माजी कोलंबकर, (कै.) पद्माकर अंबुलगेकर, यांनी ग्रंथपाल म्हणून सेवा दिली. काष्ठ शिल्पकार, नारायण पांचाळ ग्रंथपाल पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर अभ्यासू पत्रकार सुर्यकांत मालीपाटील आज वाचनालयात ग्रंथपाल म्हणून सेवा देत आहेत. वाचकांच्या पाठबळावर शासनाने श्री शारदा वाचनालयास "ब" दर्जा देवून गौरविले आहे. वाचनालयाच्या वतीने दरवर्षी यशस्वी व्यक्ती, साहित्यिक, व्याख्याते यांची वाचकांशी भेट देण्याचा उपक्रम हाती घेतले जातात. हे विशेष.