नांदेड| जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 20 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 799 एवढी झाली असून यातील 1 लाख 106 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 99 हजार 850
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 79 हजार 839
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 799
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 106
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक