नांदेड| महापालिका क्षेत्रातर्गत महापुरुषांच्या पुतळे उभारणीसह सुशोभिकरण करुन सुंदर नांदेड बनवण्याच्या संकल्पनेला महापालिका प्रशासन व पदाधिकार्यांनी "हरताळ" फासला असून मानवाला मुक्तीचा मार्ग दाखवून जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीत तथागत गौतम बुध्द मुर्ती उभारणीचा विषय प्रलंबीत ठेवुन समस्त बुध्द अनुयायी व नागरीकांच्या भावनात्मक खेळ आपल्या प्रशासना कडून खेळली जात आहे. हा खेळ बंद करून तातडीने भिमघाट येथील नियोजीत तथागत गौतम बुध्द मुर्ती उभारणीचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यानी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, तथागत गौतम बुध्द मुर्ती उभारणीचा प्रस्ताव मनपाच्या सर्वसाधारण सभेत सन मे २०१८ मध्ये प्रस्तावित होवुन त्यास मंजुरी, मिळाण्यास सन २०१९ माहे नोव्हेंबर पर्यंत दिडवर्ष कालावधी लोटला. मुर्ती उभारणीसाठी केवळ कागदोपत्री ठराव मंजूर करुन आजपर्यंत या विषयाकडे लक्ष देण्यास महापालिकेच्या प्रशासनास व सत्ताधारी काँग्रेस व लोक प्रतिनिधींनी या विषयाकडे जाणुन बुजून पाठ फिरविल्याचे दिसून येते आहे.
बुध्द मुर्ती बसविण्याचा प्रस्तावानंतर महापुरुषांच्या पुतळयाबाबत आलेले ठराव मान्यतेसह कामाची पुर्णत्वाकडे मार्गी लावली असून, तथागत गौतम बुद्ध मुर्ती न बसवुन आपणाकडून समाजाची चेष्टा चालविली जात असल्याची भावना समाज बांधवाना निर्माण होत आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ तथागत गौतम बुध्द मुर्तीचे काम सुरु करुन जागतिक स्तरावर साजरी होणाऱ्या बुध्द जयंती तथा गौतम बुध्द पोर्णिमा पर्यंत मुर्ती बसविण्यात यावी.
अन्यथा सदर प्रकरणी काम सुरु न केल्यास दि.१४ मार्च २०२२ रोजी पासुन प्रशासनासह लोक नियुक्त प्रतिनिधी व नांदेड जिल्हा पालकमंत्री यांच्या निषेधार्थ आपल्या कार्यालयासमोर 'आमरण उपोषण तसेच अन्य आंदोलनात्मक पाऊल उचलले जाईल. याची गंभीर दखल घ्यावी असे दि.०७ रोजी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. याबाबत महापालिकेने कोणत्याही हालचाली केल्या नसल्याने आजपासून उपोषण सुरु झाले असून, उपोषणाचा पहिला दिवस असल्याचे वंचीत बहुजन आघाडीचे भाऊराव भदरगे, सोपान वाघमारे यांनी सांगितले आहे.