▶️ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोड चिट्ठी मिळुण ३ महिने उलटले तरी शेतकऱ्यांची ऊस तोडणी का होईना .. ?
▶️तात्काळ ऊस तोडणी करा अन्यथा सामुहिक आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा....
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सिंचन तलाव तुडुंब भरलेले आहेत यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिकाची लागवड केली आहे.
तालुक्यातील शिवाजी शुगर स्टेशन,दत्त नगर मांजरी येथील सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे चालू २०-२१ वर्षे हंगामातील ऊस पिक शेतातच पडुन राहण्याची भिंती अनेकांनी व्यक्त केली आहे.
ऊस लागवड करून जवळपास १४ महिणे पुर्ण झाल्याने ऊसाला तुरे येवुन ऊस उभा वाळुन जात आहे यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. साखर कारखान्यां पासून अगदी जवळच असलेल्या जाहुर, बिल्लाळी, उंद्री, चोंडी,जामखेड,तुपदाळ ,हसनाळ,पाळा, राजुरा मुक्रामबाद, चांडोळा , खंडगाव,सह तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी शेतातील उभे पीक पाहूण चिंतेत सापडले आहेत.
तालुक्यातील मोजे उंद्री येथील शेतकरी तथा माजी सरपंच राजु पाटील उंद्रीकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसतोडणी तात्काळ करुन शेतकऱ्यांची आर्थिक, मानसीक नुकसान थांबवावी अन्यथा मांजरी सहकारी साखर कारखान्या समोर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी भास्कर सुर्यवंशी, हणमंत वडजे, प्रभाकर वडजे, ज्ञानेश्वर वडजे यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
ऊस तोडणीची तोड चिट्ठी देऊन दोन ते तिन महिने उलटले असता शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला जाब विचारला असता आज उद्या करून चालढकल करत शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत.
याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्याच्या व्यवस्थापकांना तोंडी व लेखी स्वरूपात सुचना करूनही साखर कारखान्याच्या शेतकरी विरोधी व्यवस्थापकांनी कोणतीही उपाययोजना न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. मा.जिल्हाधिकारी विपिन इटनकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावे अशी तालुक्यातील शेतकरी वर्गातुन होत आहे.