शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आ. बालाजी कल्याणकर विधानसभेत कडाडले -NNL

शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबाबत मंत्र्यांचे आदेश


नांदेड।
उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सध्या सुरु असलेल्या महावितरण विभागाच्या विज खंडीत मोहीमेबद्दल थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करत राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक होत आ. बालाजी कल्याणकर यांनी मंगळवारी थेट विधानसभेमध्ये वीज तोडणीचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी खंडीत केलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्याबाबत महावितरण विभागाला सुचना केल्या आहेत.

जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सध्या हरभरा, भुईमुग, गहू, ऊस यारख्या नगदी पिकांची लागवड झालेली आहे. सदरील पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असुन कॅनॉलच्या पाण्याद्वारे पाणीही उपलब्ध झालेले आहे. पण महावितरण कंपनीने कोणतीही पुर्व सुचना न देता ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावला जात होता. हाच मुद्दा नांदेड उत्तर चे आ. बालाजी कल्याणकर यांनी पाँईट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यतातुन अर्थसंकल्पीय अधिवेशात उपस्थित केला. 

मितभाषीय आ. बालाजी कल्याणकर आक्रमक होत हा मुद्दा विधानसभेत लावून जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले जात आहेत. आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केलेला तात्काळ पुर्वरत करण्याबाबत महावितरण विभागाला सुचना दिले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी