नवीन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महापालिकेतील झोन मधील प्रत्येकी दोन याप्रमाणे दहा करवसुली लिपिकांना दिनांक २२ ते २४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या बैठकीत कर वसुली लिपिकाना कर वसुली कमी का झाली , याकारणावरून मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी करवसुली लिपिकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
त्या कर्मचाऱ्याच्या मानसीक व कौटुंबिक खचीकरणाचा विचर करून त्यांना परत कामावर घेण्यात यावे आसे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दर्शने व त्यांच्या निलंबित सहकारी कर्मचारी यांनी मनपा आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांना दिनांक ८ मार्च रोजी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकाचे कर्तव्यदक्ष आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी दिनांक २२ ते २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मनपातील करवसुली लिपीकांच्या कामाची चाचपनी करण्यात आली त्यामध्ये ज्या करलिपीकांच्या वसुलीची टक्केवारी १५ टक्क्यांपेक्षा कमी आली त्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले यामध्ये ६ झोन पैकी ५ झोन मधील प्रत्येकी दोन याप्रमाणे १० कर वसुली लिपीकाना कोणत्याच प्रकारची समज न देता एकतर्फी निर्णय घेऊन तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
पण कर वसुल का ? होत नाही याकडे मनपा प्रशासनाने संबधीत वस्त्यामध्ये प्रत्यक्ष देखरेख केली का ? त्याठीकानी नागरीकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत का? आम्ही सुविधा उपलब्ध करून देवुशक्त नाही तर येथील नागरीक कर भरतील का या बाबींचा विचार मनपा प्रशासनाने नक्कीच करायला हवा होता आणि त्याच बरोबर या भागातील कर वसुली लिपीकांचा देखील विचार करायला हवा होता कारण या वस्त्या झोपड सदृष्य परिस्थिती, दलित वस्ती,अत्यल्प उत्पन्न गटातील नागरीकांच्या वस्त्यांचा समवेश आसल्याने येथील बहुतांशी नागरीकांचा उदरनिर्वाह रोजी- मजुरीवर आसल्याने यांची कर भरन्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्यांने ते शंभर टक्के कर भरू शकत नाहीत त्यामुळे येथील भागातील वसुलीची टक्केवारी कमी होत आहे.
येथील नागरीकाना आम्ही जस्तीचा तगादा दिल्यास तुमच्या प्रशासनाने आम्हाला आजपर्यंत काया सुविधा पुरविल्या आहेत ते सांगा या भागतील वस्त्यांमध्ये भौतिकसुविधा ज्यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते,नाल्या, लाईट, मलनिसारण वाहिनी या सुविधा व्यवस्थीत नसताना येवडा कर कसासाठी वसुल करात आहोत तुम्ही आम्हाला सुविधा द्या ! नंतर कर लसुल करा आसे बोलले जाते तेव्हा याठीकानी मनपा प्रशासनाने त्यांची दखल घेवुन त्याना सुविधा दिल्या असत्यातर आमच्याकडुन सुध्दा मोठ्या प्रमाणात वसुली झाली आसती या सर्व बाबींचा विचार मनपा आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी न करता या भागात कर वसुली लिपीकांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्यावर आन्याय झाल्यामुळे त्यांचे मानसीक व कौटुंबिक खचीकरण झाले आहे यामुळे आम्हाला नाहक ञास होत आहे.
तेव्हा आयुक्त डाॅ सुनिल लहाने यांनी सदरील बाबींचा गांभिर्याने विचार करून निलंबनाची कारवाई रद्दकरून निलंबित कर्मचाऱ्याना पुर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे आशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर वरील नमुद केलेल्या बाबींचे निवेदन माहितीस्तव जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे देखील दिनांक ८ मार्च २०२२ रोजी देण्यात आले आहे. या निवेदनावर कॉस्ट्राईब संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दर्शने,लखन कुटे,रमेश यशवंतकर,प्रविण शितळे, तोलाजी वाईकर,सुरेश जोंधळे,सिध्दार्थ हटकर,कपिल जोंधळे,परबता सुरेवाड,बालाजी कल्याणकर यांच्या सदरील निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.