आज दिनांक ४ मार्च पासून १२ विच्या परीक्षा सुरु होत असून यात आठ केंद्र आहेत यात शिराढोन भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय केंद्र संचालक म्हणून भिसे विजय, महात्माफुलें वाघाळा उच्च माध्यमिक विद्यालय येथे केंद्र संचालक बी. बी .इंगेवाड राष्ट्रमाता उच्च माध्यमिक विद्यालय वाजेगाव केंद्र संचालक म्हणून हणमंत फाजगे ,उच्च माध्यमिक वसंतराव नाईक वसरणी केंद्र संचालक म्हणून प्रा .डॉ.शेखर घुंगरवार ,शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको येथे केंद्र संचालक म्हणून शिंदे बबनराव,
आनंदराव शिवशक्ती उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी केंद्र संचालक म्हणून कदम बी.एस. कुसुमताई उच्च माध्यमिक विद्यालय सिडको , केंद्र संचालक म्हणून संजय चाटे ,इंदिरा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय केंद्र संचालक म्हणून डॉ .प्रा .रमेश नांदेडकर असे एकूण आठ मुख्य केंद्र असून असून याचे परीक्षक म्हणून रत्नाकर मुंगल हे काम पाहत आहेत व सहाय्यक परीक्षक म्हणून २१ जण आहेत,४ मार्च रोजी पहिला पेपर असून यात २४०९ विध्यार्थी परीक्षा देणार आहेत, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.