नांदेड, आनंदा बोकारे| तालुक्यातील सोमेश्वर येथे शिवजन्मोत्सव व महाशिवरात्रीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नुकताच झालेला शिवजन्मोत्सव सोहळाही येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव व महाशिवरात्रीनिमित्त गावातील तरुणांच्या पुढाकारातून वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला माजी मंत्री डी.पी.सावंत, महापौर जयश्री पावडे, सहा.पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम, निलेश पावडे, बबनराव वाघमारे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे, विठ्ठल पावडे, गंगाधर कदम, अमोल कदम, सुनिल कदम, विठ्ठल कोरडे, बालाजी सुर्यवंशी, नरहरी वाघ, संगिता पाटील डक यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजित रक्तदान शिबिरात सोमेश्वर व परिसरातील तरुणांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला होता. संकलित केलेल्या रक्तपिशवी जीवन आधार रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आल्या. यासाठी रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचार्यांनी सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडल्यानंतर गोदावरी काठावर विविध जातींचे वृक्षरोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी जनार्दन बोकारे, उपसरपंच बाबुराव बोकारे, पोलीस पाटील सोमाजी बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपिनाथ बोकारे, प्रकाश बोकारे, विक्राम बोकारे, सुदाम बोकारे, गोविंदराव बोकारे, तानाजी बोकारे, सदाशिव बोकारे, बाबुराव बोकारे, उद्धव बोकारे, मनोहर बोकारे, निखिल बोकारे, गजानन बोकारे, दिगांबर बोकारे, ज्ञानेश्वर बोकारे, देवानंद बोकारे, करण बोकारे, उद्धव बोकारे, पुंडलिक बोकारे, दत्ता बोकारे, ज्ञानेश्वर बोकारे, पप्पु धुमाळ, संदीप सरोदे, सुरेश सरोदे, राजु महाराज, जितेंद्र सरोदे, मुरलीधर कौसे, रामेश्वर सरोदे यांच्यासह गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.