कोंढवा दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी-NNL

इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचा सत्याग्रह


पुणे।
ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मरण पावलेल्या बालकाच्या मृत्यू संदर्भात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  करावा, मृत बालकाच्या  कुटुंबियाना शासनाकडून सहाय्यता मिळावी, या मागणीसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने ७ मार्च रोजी सकाळी ११ पासून बेमुदत सत्याग्रह करण्याचा इशारा दिला आहे. 

ग्रुपचे अध्यक्ष असलम बागवान यांनी या संदर्भात आज कोंढवा पोलिस स्थानकात निवेदन दिले. कोंढवा येथील नवाजिश पार्क,गल्ली नंबर 10 येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे.

काम करत असताना ठेकेदाराने व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या सुरक्षेबद्दल लापरवाही करुन रस्ते खोदण्याचे काम चालू केले आहे. काम करत असताना संबंधितांनी कोणती दक्षता न घेतल्याने 5 वर्षाच्या शहजाद अमीर सय्यद या बालकाला आपला जीव गमवावा लागला.

रस्ते खोदताना त्या जेसिबीचा फटका विद्युत वाहीनीच्या डीपीला बसला व त्यातील एक वायर तुटली. त्याकडे त्या जेसीबी चालकाने व ठेकेदाराने दुर्लक्ष केले . या दुर्लक्षाची शिक्षा 4 वर्षीय शहजाद अमीर सय्यद या बालकाला भोगावी लागली. 

२ मार्च रोजी  दुपारी २ च्या सुमारास त्या तुटलेल्या वीज वाहिनीला 4 वर्षाच्या शहजाद अमीर सय्यद या बालकाचा हात लागला .तो त्या विजेच्या धक्क्याने त्याचे जागीच मृत झाल्याची माहीती नागरिकांनी दिली. ज्या अधिकारी व ठेकेदाराच्या, जेसीबी चालक, लाईटमन ,वायरमन, वीज मंडळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे त्या बालकाचे मृत्यू झाले त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बागवान यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी