सहभागी होण्यासाठी भिवानी (हरियाणा) येथे रवाना
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुस्ती (फ्री स्टाईल व ग्रीको रोमन) संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चौधरी बन्सीलाल विद्यापीठ, भिवानी (हरियाणा) येथे रवाना झाला आहे.
या संघात विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील एकूण १९ खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये सय्यद अनवर, नामदेव गोरे, महेश तातपूरे, देवानंद पवार, श्रीकांत जाधव, राम पुजारी, सरनोबद मुनतजीर, दिपक सगरे, प्रसाद शिंदे, हर्ष चौधरी, हनुमंत घोळवे, विनोद कांबळे, पार्थ कंधारे, पवन गोरे, सय्यद अजीम, गोविंद बिराजदार, तुकाराम महानवार, योगीराज नागरगोजे, दिपक वडजकर यांचा संघात समावेश आहे. सोबत संघाचे मार्गदर्शक डॉ. विठ्ठल दुमनर व व्यवस्थापक डॉ. मधुकर क्षीरसागर हे आहेत.
संघातील खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, नांदेड जिल्ह्यातील कुस्तगीर पैलवान व उस्ताद नारायणसिंघ वासरीकर, शहरातील जुने कुस्तीगीर व उस्ताद श्री. दगडू लाल रिन्दकवाले, क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार इत्यादींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संजयसिंह ठाकुर, शिवाजी हंबर्डे, के.एम. हसन, रतनसिंह पुजारी उपस्थित होते.