येवती बसस्थानकावर प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी -NNL

मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यातील येवती हे गाव जि.प. सर्कल व तिर्थक्षेत्राचे मोठे गाव असून येथे आठवडी मंगळवारचा भाजीपाला व गुरांचा मोठा बाजार भरतो पंचक्रोशीतील पंधरा ते वीस गावांतील दैनंदिन खरेदी व विक्रीचा व्यवहार  येवती येथील बाजारपेठेतुन चालतो .

हिंदू धर्मियांचे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या येवती गावामध्ये श्रीसंत सदगुरु नराशाम महाराजांची दर वर्षी जानेवारी महिन्यात मोठी यात्रा भरते तर आमवस्या, पोर्णीमा, एकादशीला  तालुक्यातील भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात .

दर्शनासाठी येथे येणाऱ्या भाविकांना  बस किंवा खाजगी वाहनांची दोन- दोन तास वाट पाहत ताटकळत बसावे लागते. अशा वेळी विशेषतः महिला प्रवाशांना येथे बसण्याची सोय नाही.सर्वत्र हॉटेल व इतर दुकाणे असल्याने महिलांना रोडवरच उभं राहावं लागतं त्यांतच उन्हाळ्यात थांबताना तर लहान लेकरांची व वृध्द व्यक्तीची  कमालीची परेशानी होते . 

म्हणूनच येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी जनतेतून होताना दिसून येत असल्याने मुखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांनी त्यांच्या आमदार निधीतून येवती येथे प्रवाशी निवारा बांधुन द्यावे अशी मागणी जनतेच्या वतीने विठ्ठल पाटील येवतीकर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख भाजपा किसान मोर्चा नांदेड व मुखेड भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ हिरमलवाड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी