कला, व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकीचा हृद्य सोहळाा-NNL


नांदेड। कट्टीज फोटो आर्ट गॅलरी' हे नांदेड मधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिष्ठान आहे. उच्च प्रतीची कलात्मकता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा आणि त्यासोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव ही वैशिष्ट्ये राघवेंद्र कट्टी यांनी कटाक्षाने जपली आहेत. यामुळे ते असंख्य नांदेडकरांचे एक जिव्हाळ्याचे ठिकाण झाले आहे. 

या उपक्रमास याच महिन्यात 25 वर्षे पूर्ण झाली आणि त्याचवेळी अधिक विस्तृत व सोयींनी युक्त जागेत स्थलांतर झाले. याच वेळी जागतिक महिला दिनाचाही सुयोग साधून एक भव्य व हृद्य सोहळा दि. 9 मार्च रोजी पार पडला.

महिला दिनाचे औचित्य साधून राघवेंद्र व स्वाती कट्टी या दाम्पत्याने विविध क्षेत्रात कार्य कर्तृत्वाने आपला ठसा उमटणाऱ्या निवडक महिलांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. वृषाली किन्हाळकर तर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर विशेष आमंत्रित म्हणून प्रजावाणीच्या मानसी पुरावणीच्या संपादिका ऍड. दीपा बियाणी व सौ. अनुजा डोईफोडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. 

सुरवातीस ' कट्टीज फोटो आर्ट गॅलरीच्या ' नव्या जागेतील आत्याधुनिक स्टुडिओचे उदघाटन  सौ. राजश्री पाटील व इतरयांचे हस्ते करण्यात आले. या नंतर विशेष कर्तृत्ववान महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री राघवेंद्र कट्टी यांनी मोजक्या शब्दात सत्कार मूर्तींचा परिचय करून दिला. 

यावेळी सौ.चंद्रकला कुलकर्णी , सौ. आनंदी विकास, सौ.डॉ. विभा भालेराव, सौ.डॉ. माधुरी मान्नीकर, सौ.डॉ. पद्मा राठी, सौ.डॉ. अर्चना बजाज, सौ.डॉ. अंजली डावळे, डॉ. शैलजा वाडीकर, सौ. माया अत्रे, सौ. सविता कट्टी, सौ. सुजाता जोंधळे, सौ. गार्गी योग आनन्द, सौ. चंदा सचिन मोहिते, श्रीमती कविता जवादवार, सोनू पठाण, ज्योती होपळे, सौ. नीता केशव पवार सत्कारानंतर डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी या अभिनव व औचित्यपूर्ण समारंभाबद्दल कट्टी दाम्पत्याचे कौतुक केले आणि सत्कारमूर्ती महिलांच्या कार्याचा नेमक्या शब्दात गौरव केला. अध्यक्षीय समारोप करतांना सौ. राजश्री पाटील यांनी या भव्य व मनःपूर्वक उपक्रमाबद्दल अभिनंदन करून स्टुडिओच्या भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास नांदेड मधील विविध क्षेत्रातील प्रेक्षक आवर्जून व मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी