संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारांचा लाभ घेऊन महिलांनी आपलं जीवन प्रफुल्लीत करावे -NNL

सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार

किनवट, माधव सूर्यवंशी। संविधानाने दिलेल्या आपल्या हक्क व अधिकारांचा पुरेपुर लाभ सर्व महिलांनी घेऊन आपलं जीवन सुखर व प्रफुल्लीत करावे , असे प्रतिपाद सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी केले.

जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतील ' आझादी का अमृत महोत्सव ' व जागतिक महिला दिन निमित्त येथील पंचायत समिती सभागृहात मंगळवार (दि.08) रोजी आयोजित महिला सप्ताह : उत्सव स्त्री जाणीवांचा' समारोप समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

पं.स. सभापती हिराबाई लक्ष्मण आडे अध्यक्षस्थानी  होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हा परिषद नांदेडवरून ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटनपर मार्गदर्शन केले.अतिदूर्गम, आदिवासी, डोंगरी क्षेत्रात निस्मीमपणे काम करणाऱ्या सर्वच विभागातील महिला कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. महिला दिनाच्या सर्व सावित्रीच्या लेकींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी तहसिलदार डाॅ. मृणाल जाधव, उप सभापती कपील करेवाड, पं.स. सदस्या सुरेखा सुभाष वानोळे, क्रांतिज्योती सावित्राबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, ऍड. के. के. साबळे आदि प्रमुख अतिथी वक्ते व पत्रकार गोकुळ भवरे मंचावर उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पुण्यरथा उमरे यांनी आभार मानले.

मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण केल्यानंतर वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे सुरेश पाटील, प्रज्ञाचक्षू गायीका राजश्री पुद्दलवार यांनी प्रज्ञाचक्षू संगीतकार प्रदीप नरवाडे यांच्या की बोर्ड, सूरज पाटील यांच्या तबला व राहूल तामगाडगे यांच्या आक्टोपॅड साथीने नारी गौरव गीते सादर केली.

ता. 2 ते 8 मार्च 2022 या कालावधीत गट विकास अधिकारी सुभाष धनवे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे व बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या मार्गदर्शनाखाली शालिनी सेलूकर यांनी झुंबानृत्य , रेखा उबाळे यांनी योगाभ्यास , पुण्यरथा उमरे, वर्षा कुलकर्णी, रूपाली पतंगे यांनी विविध स्पर्धा व उपक्रमांचं आयोजन केलं होत.

मागील वर्षभरात आरोग्य, अंगणवाडी, शिक्षण व इतर सर्व विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील यशवंत सावित्रीच्या लेकींना पारितोषीके देण्यात आली. शिक्षणामुळेच रुढी परंपरेच्या विळख्यातून महिला बाहेर पडल्या, उच्च पदावर पोहचल्या असे प्रतिपान प्राचार्या शुभांगी ठमके यांनी केले. तहसिलदार डॉ. मृणाल जाधव सखींशी संवाद साधतांना  म्हणाल्या की, आपण स्वनिर्णयाने आपली वेगळी वाट निवडून उत्तूंग झेप घ्यावी, यशाचं शिखर गाठावं.

कार्यक्रमास तालुक्यातील सर्व महिला डॉक्टर्स, विस्तार अधिकारी,  ग्रामसेविका, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, एएनएम, आशावर्कर, रोजगार सेविका व इतर महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होत्या. प्रमुख मान्यवरांसह महिलांनी फेटे बांधल्याने कार्यक्रम रुबाबदार झाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी