कंधार| विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर क्राईम शाखा यांनी नोटीस बजावली त्या मुळे आघाडी सरकारचा निषेध करत भारतीय जनता पार्टी च्या वतीने नोटीसीची होळी करण्यात आली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्या ऐवजी महा विकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली ज्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कंधार च्या कार्यकर्त्यांनी कंधार येथील महाराणा प्रताप चौक येथे त्या नोटिशीची होळी करून आघाडी सरकारचा निषेध केला.
यावेळी आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांची भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत एका मागत एक मंत्री तुरुंगात जात आहेत त्यांचा पापाचा घडा भरत आहे. त्यामुळे आघाडी सरकारची नेते घाबरून गेले आहेत परिणामी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. असे मनोगत भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी यावेळी व्यक्त केले तसेच, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्यात त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणीस यांनी गृहसचिव यांच्याकडे तपासणीसाठी सादर केला.
त्याचाच राग मनात धरून आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कट कारस्थान रचत आहेत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारला ही जनता निश्चितच जागा दाखवेल असे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी यावेळी केल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड तालुका सरचिटणीस किसन डफडे, भाजपा शहराध्यक्ष अड. गंगाप्रसाद यन्नावार ,सरचिटणीस मधुकर डांगे ,चेतन केंद्रे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अड सागर डोंगरजकर ,संभाजी घुगे ,माजी नगरसेवक सतीश कांबळे, राजू लाडेकर ,महेश मोरे ,दिपक गोरे,आनंदा टोकलवाड ,बळीराम मिरकुटे ,प्रवीण बनसोडे ,बाळू धुतमल, आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.