लोहा| उत्तर प्रदेशासह चार राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली .उत्तर प्रदेशात पुन्हा योगीजी चे सरकार आले त्याचा आनंदोत्सव लोह्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षाप्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात चार राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडवीत भाजपने दणदणीत विजय मिळवला .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या कार्यालया समोर फटाके वाजवून जल्लोष केला पेढे वाटले. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे -चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा विजयाचा आनंदोत्सव करण्यात आला.
यावेळी भाजपचे लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे माजी सभापती शंकर पाटील ढगे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस व माजी उपसभापती रोहित पाटील, आंडगेकर नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक प्रतिनिधी केतन खिलारे, नगरसेवक संदीप दमकोंड वार ,माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, रंगराव पाटील, टेळकीचे सरपंच संदीप देशमुख, गोविंदराव गुरुजी टरके, भारत कदम, भानुदास पवार ,माधव गायकवाड, उद्धव पाटील सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगीजी यांच्या सुशासन व्यवस्थेचा हा विजय आहे. देशात डब्बल इंजिनचे सरकार जनतेला पाहिजे .महाराष्ट्रातील जनता सुद्धा त्याच विचारधारेची आहे. राज्याच्या राजकारणावर याचा परिणाम होईल असे भाकीत प्राणिताताई यांनी व्यक्त केले.