नांदेड| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मूलमंत्र घेऊन सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी ज्या योजना राबविल्या. प्रत्येक योजना भ्रष्टाचारमुक्त करून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा केला. शेतकरी, शेतमजूर, शोषित पीडित वांचीतानही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केले आहे.
त्यामुळे देशातील सर्वच राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड मोठा विश्वास आहे .या विश्वासाच्या बळावरच गुजरात, मणिपूर, गोवा, उत्तराखंड राज्यात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांचा विजय असून सर्वसामान्य मतदारांचा हा विजय आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेली विकास कामे. गुंडागर्दी मुक्त उत्तर प्रदेश .सर्वसामान्यांना दिलेला न्याय आणि संरक्षणाबद्दल जनतेमध्ये निर्माण केलेला विश्वास या बळावर उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.या चारही राज्यांत मिळालेला विजय हा विकास कामाचा विजय आहेत अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.