लोहा| शहराच्या जवळ असलेल्या श्री शरद पवार हायस्कूल मध्ये इयता नववी वर्गात शिकणारी अफजल व इरफान या विद्यार्थ्यांनी कष्ट कमी पडावेत यासाठी शक्कल लढवीत जोड सायकल तर केली .तीन चाक...दोन सीट.. अशी ही जोड सायकल..ऐंशीचया दशकातील जोड एसटीची आठवण करून देते.
शहराच्या लगत कबेगाव आहे तेथील विद्यार्थी चितळी येथील श्री शरद पवार हायस्कुल मध्ये अफजल पठाण व ईरफान पठाण हे नववी वर्गातील विद्यार्थी... काबेगाव हे त्यांचे गाव .या गावापासून शाळे पर्यन्त सायकल जातात. रस्त्याचे हाल सांगू नये असेच .. याचा या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतोय त्यावर शक्कल लढवीत या दोघांनी जोड सायकल तयार केली त्यासाठी त्यांना खूप वेळ लागला पण प्रयत्न व कष्ट याचे चीज झाले.
आता त्यामुळे मेहनत वाचली.परेशनी कमी झाली. शाळेत जेव्हा हे दोघे या जोड सायकल वर आले तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना कुतूहल वाटले .शाळेचे मुख्याध्यापक श्री खांडेकर यांनी त्यांना शाब्बासकी दिली व अभिनंदन केले .आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव देत या विद्यार्थ्यांनी नवीन आयडिया वापरली. त्याच्या या नवनिर्मिती बद्दल शाळेचे शिक्षक बब्रुवान खांडेकर, शिवाजी काळे, बापू गायखर, गोविंद उंडाडे, ऋषिकेश जोगदंड, संजय बनसोडे ,पुंडे, तुकाराम सुर्यवंशी,मनोज पस्तापुरे,भारत सुर्यवंशी, संगीता ढवळे,मीरा शिंदे यासह शिक्षक , कर्मचारी व मित्रांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे