कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड भुषण डॉ.दिलीपराव पुंडे होते तर उद्घाटक म्हणून जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड, विरपत्नी कोमल काळे, काँग्रेसचे दिलीप कोडगिरे, उत्तमआण्णा चौधरी, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुटे, सरपंच प्र.शंकर पाटील जांभळीकर,सुरेश पाटील बेळीकर, सरपंच प्र.बालाजी पाटील सांगवीकर, सरपंच भुजंग देव्हारे, सरपंच प्र.संदीप पा.घाटे, ग्रा.पं.सदस्य सुनिल आरगिळे, भारत गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिलीपर पा. बेटमोगरेकर बोलताना म्हणाले की ज्ञानेश्वर डुमणे यांनी गेल्या चार वर्षापासून मुखेड तालुक्यांमध्ये सामाजिक बांधिलकीतून अनेक दर्शनीय उपक्रम राबवित आहेत... आम्हा मुखेड वासि यांसाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे कमी वेळामध्ये आपल्या मेहनतीच्या बळावर अकॅडमीचे व मुखेड तालुक्याचे नाव महाराष्ट्रभरात पोहचवले.देशासाठी सैनिकांचे खूप मोठे योगदान आहे या ठिकाणी जिल्ह्यातील ५० ते ६० आजी माजी सैनिकांची उपस्थिती पाहून खरंच आम्हालाही अभिमान वाटला.
कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार संघाचे सचिव महेताब शेख यांनी केले, प्रस्तावना राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी चे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बालाजी चुकलवाड यांनी मानले.
रक्तादान शिबिराचे रक्त संकलण करण्यासाठी डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ब्लॅड बँक विष्णुपुरी नांदेड येथील टिमने सहकार्य केले यावेळी राजमुद्रा ग्रुपचे सचिन पाटील इ़ंगोले, प्रहारचे जिल्हाप्रमुख शंकर वडेवार, शहर प्रमुख साईनाथ बोईनवाड, बालाजी बाबळे, गोविंद घोगरे, शिवव्याख्याते बजरंग पाटील, प्रहारचे ता. उपाध्यक्ष बालाजी आईनवाड, बलभिम शेंडगे, बाबुराव गिरबनवाड, बळवंत पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सैनिक,पॅरामिल्ट्री, विविध संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व राजे छत्रपती मिल्ट्री अकॅडमी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.