या त्रैमासिक तक्रार निवारण सभेत वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या विविध अडीअडचणींवर सविस्तर चर्चा केली त्यातील काही प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे- वन कर्मचारी यांचे मासिक वेतन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यासाठी संघटनेकडून मुद्दा उपस्थित केला व नांदेड वन विभागातील भरपूर रेंजमध्ये वन कर्मचारी यांचे पगार दोन-तीन महिने होत नसल्याने कर्मचार्यांना त्रास होत असल्यामुळे पहिल्या आठवड्यात पगार करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी हा मुद्दा लवकरच मार्गी लागेल, असे सांगितले.
तसेच 10, 20, 30 वर्षांचे अश्वासीत प्रगती योजनेचे लाभ लवकर देण्याबाबत चर्चा केली. वन कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करून त्याची दुय्यम प्रत वन कर्मचारी यांना उपलब्ध करू देण्याबाबत अग्रहाची मागणी केली. वन कर्मचारी यांना गणवेश भत्ता चार वर्षांपासून मिळाला नसून तो मिळावा, वन कर्मचारी यांना ओळखपत्र देण्यात यावेत, सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करून प्रसिद्ध करण्यात यावी, गोपनीय अहवाल वेळेत लिहून त्याची एक प्रत वन कर्मचारी यांना देण्यात यावी, नांदेड वन विभागातील वन कर्मचारी यांची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा करून घेण्यात यावी, कर्मचारी यांना वन कायदा प्रशिक्षण व ताणतणावाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वाबळे यांनी सदरील मुद्दे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आस्वासन संघटनेस दिले.
यावेळी शिवसांब घोडके (केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य), सहदेव दोसलवार (सचिव औरंगाबाद वनवृत्त), रामेश्वर धोंडगे (नांदेड जिल्हा अध्यक्ष), मुंजाजी माळगे (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष), दत्तात्रय वळगकर (मार्गदर्शक), नितीन सिनगारे, राठोड, एस.टी.अलोने, मुसांडे, माळेकर, दत्ता गिते, खय्युम शेख, झाडे, कोटकर, भातमोडे, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भारत काकडे आणि संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.