राज्याध्यक्ष - संदीप केवटे, कार्याध्यक्ष - विलास रिंढे तर सरचिटणीसपदी शिवानंद आडे यांची निवड
नांदेड| शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना पुणे ची राज्य कार्यकारणी पदासाठीची निवडणूक शिर्डी येथे नुकतीच संपन्न झाली. सदरील निवडणुक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक निर्णय अधिकारी- नारायण घुले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी- आबासाहेब अटोल, बबन राठोड, शुभांगी तुम्मे, स्वाती झावरे यांनी काम पाहिले.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : संदीप केवटे - सातारा, कार्याध्यक्ष : विलास रिंढे -बुलढाना , सरचिटणीस : शिवानंद आडे - औरंगाबाद, कोषाध्यक्ष - वसंत जारीकोटे - नांदेड, उपाध्यक्ष : शरद सुरडकर - जळगाव, उपाध्यक्ष महिला : अंजना सोनवलकर - जालना, प्रसिध्दी प्रमुख : दिनकर चव्हाण - यवतमाळ, सहसचिव : उमेश मोहिते - सोलापूर, सहसचिव : महेंद्र गजभिये - नागपूर, सह कोषाध्यक्ष - सुष्मा देसाई - सिंधुदुर्ग
विभागीय सचिव : संतराम कसबे - लातूर, सतिश मिटकरी - औरंगाबाद, प्रवीण ठाकरे - अमरावती, आनंद मोहतुरे - नागपूर, शांताराम कांबळे - ठाणे, संतोष पाटील - कोल्हापूर, प्रशांत दोरगे - पुणे, प्रशांत पाटील - नाशिक
राज्य कार्यकारणी सदस्य : राजेश भिसे - हिंगो, नरेंद्र पकडे - अमरावती, सचिन अमृतसागर - सांगली, दत्तात्रय रोहकले - अहमदनगर, विवेक पाटील - ठाणे, अमोल म्हैसधूने - पालघर, शिवाजी राठोड - रायगड, जयकिर्तीमान पाटील - नाशिक, निलेश भदाने- धुळे. योगेंद्र बोरकर - गडचिरोली, पंकज सूर्यवंशी - गोंदिया, अनिल भोई - चंद्रपूर, राहुल देशमुख - वर्धा, अविनाश लांडे - अकोला यांची निवड करण्यात आली.
सदरील निवडणुकीसाठी मार्गदर्शक म्हणून कल्याण राठोड, पवार शंकर, संभाजी वडजे, सचिन खराद, सोमनाथ बाचकर, विजयानंद भोसले, विजय पत्रे, सुखदेव जमदाडे, जयवंत गदादे, सुजाता हजारे, छाया थोरात, संध्या कऱ्हाले, प्रमिला मडके आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.