‘द कश्मीर फाइल्स’ : काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे वास्तव दाखवणारा चित्रपट - ‘द कश्मीर फाइल्स्’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा -NNL

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी


मुंबई|
वर्ष 1990 मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दाखवणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मा. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित काश्मिरी हिंदूंना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. तसेच काश्मिरी हिंदूंच्या मुलांना महाराष्ट्रात शैक्षिणिक आरक्षणही जाहीर केले होते. ‘द कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणले जात आहे. 

हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला मा. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी कळकळीची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. मा. उद्धवजी निश्‍चितच या चित्रपटाला करमुक्त करतील, अशी आमची अपेक्षा असल्याचे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे. आज या संदर्भातील एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीने गेल्या 15 वर्षांत काश्मिरी हिंदूंच्या अत्याचाराविषयीचे ‘दहशतवादाचे भीषण सत्य’ हे फ्लेक्स प्रदर्शन 500 हून अधिक ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच ‘एक भारत अभियान : चलो कश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत अनेक राज्यांत सभा घेऊन 10 लाखांहून अधिक हिंदूंना जागृत करण्यात आले आहे. तसेच समितीच्या वतीने काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी ऑनलाईन विशेष संवाद आयोजित करण्यात आला. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत हिंदु जनजागृती समिती लढत राहिल, असेही श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.

श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ. संपर्क : 70203 83264 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी