नांदेड| दिनांक 01/03 /2022 रोजी एन.एस.यु.आय.नांदेड जिल्हाच्या वतीने युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकारने लवकरात लवकर सोय करावी. अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना साहेब पटोले व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार तसेच एन.एस.यु.आय.नांदेड जिल्हाच्या वतीने युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरत आहे. त्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी व त्यांच्यावर होणारी मारहाण थांबवण्यासाठी नांदेड येथील महात्मा फुले पुतळ्या समोर या केंद्र व मोदींचा सरकारचा निषेद करण्यात आला.
यावेळी नांदेड जिल्हा एन.एस.यु.आय.अध्यक्ष शंकर बाजीराव शिंदे, प्रतीक डेमनगुंडे, प्रबुद्ध चित्ते, अझीम शेख ,अमोल जेठे , अक्षय नळगे ,माधव कदम , शिवांश सोळंके , महेश देवसरकर ,किरण पडलवर ,उमेर शेख ,सुरज शिंदे, अझर शेख ,निखिल बनसोडे , पियुष पाटील या वेळी आदी उपस्तित होते. मोदी सरकारने लवकरात लवकर त्यां विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नांदेड जिल्हा एन. एस.यु.आय.ने दिला त्यावेळी सर्व एन.एस.यु.आय.चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.