उस्माननगर, माणिक भिसे| चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पु.२७२ ,इ.स.पु.२३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा होता. आसे मार्गदर्शन मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले.
सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे दि.४ मार्च रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक भगवान राक्षसमारे, देविदास डांगे,मन्मथ केसे,श्रीमती मणिषा भालेराव,नगमा शेख,शकील शेख, पत्रकार गणेश लोखंडे, माणिक भिसे यांची उपस्थिती होती.