मंदिर कमिटीने केली खा.हमेंत पाटील यांच्याकडे तीर्थक्षेत्र दर्जा आणि सभामंडपाची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रती वर्षी महाशिवरात्री निमित्त कार्ला येथील कृष्ण मंदिराची काठी दहा दिवसाच्या भ्रमंतीला निघते. पहिल्या दिवशी निघालेली कृष्णाची काठी विदर्भ - मराठवाड्याच्या भ्रमणीहू परत आल्यानंतर दि. १६ मार्च रोजी भव्य महाप्रसाद भंडारा आणि मान्यवरांचा स्वागत सत्कार सोहळ्याने समारोप करण्यात आला आहे.
वाढत्या स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येक माणूस भौतिक सुख मिळविण्यासाठी जीवाचा आटा-पिटा करून पैसा मिळविण्याकडे धावत आहे. त्यामुळे मानसिक समाधान हरवून बसला असून, मनशांती लोप पावली आहे. त्यामुळे आपली संस्कृती विसरू लागला आहे. खरे समाधान प्राप्त करावयाचे असले तर भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशीच अशीच ईश्वर भक्तीची ओढ लागलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी.येथील श्री कृष्ण मंदिराची काठी महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भ्रमंतीला निघाली होती. कार्ला येथून आलेल्या श्री कृष्णाच्या काठीचे हिमायतनगर शहरासह ठिकठिकाणी आगमन होताच भाविक - भक्तांनी जोरदार स्वागत करून भक्तिभावे दर्शन घेतले आहे.
मागील अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या चालत आलेली धार्मिकतेची परंपरा जोपासत कार्ला पी. येथील निघालेली कृष्णाची काठी हलगीच्या तालावर वाजत गाजत हिमायतनगर व उमरखेड तालुका परिसरातील खेड्या - पाड्यात फिरविली जाते. भगवान श्रीकृष्णाची काठी गावात दाखल होताच भक्तांचा जत्था काठीच्या दर्शनासाठी गोळा होतो. मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेवून पूजा - अर्चना करून अन्नदान, दक्षिणा आदी देतात. काठी सोबत हलगी, अंगारा व दहा ते बार भक्तांचा संच असतो.
शहर गावातील मुख्य कमानीजवळ तथा चौक -चौकात हलगीच्या तलावर श्रीकृष्णाची काठीची उंच हाती धरून भक्तगण नाचतात. हे दृशा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते. दहा दिवसानंतर दि.१४ मार्च रोजी परत कार्ला पी. गावात आली. त्यानंतर दुसऱ्या गावात जल्लोषपूर्ण वातावरण शोभा यात्रा काढून दि.१५ रोजी श्रीकृष्ण मंदिरात काठीचा मुर्तीसमवेत विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. त्यानंतर वर्षभरात निसर्गाच्या पद्दाथीने घडणाऱ्या घाण घडामोडीचा वारसा सांगण्यात आला. या दिनी देवकाराकडून सान्गनाय्त येणार वारसा तंतोतंत खरा ठरतो अशी येथील गावकर्यांची धारणा आहे.
दुसऱ्या दिवशी अनेकांनी आपला नवस फेडण्यासाठी शिधा दिल्यानंतर दि.१६ रोजी भव्य महाप्रसादाच्या पंगतीने समारोप करण्यात आला. यावेळी बाहेर गावाहून आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. स्वागतानंतर या कार्यक्रमास उपस्थित झालेले खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, सुनील दमकोंडवार, कार्ला गावचे सरपंच व इतरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने खासदार हेमंत पाटील यांच्याकडून येथील जागृत देवस्थान श्री कृष्ण मंदिराच्या सभामंडपाची निधी उपलब्ध करून देऊन भक्तांची अडचण सोडवावी. तसेच हिमायतनगर तालुक्यात एकमवे कार्ला येथे श्रीकृष्ण मंदिर असल्याने या मंदिरात दर्शन घेऊन केलेली मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे या श्रीकृष्ण मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांनी भाविकांची मागणी लक्षात घेता आपण ग्रामपंचायत आणि मंदिराच्या लेटरहेडवर मागणीचा प्रस्ताव द्यावा. आपली मागणी खासदार महोदयाकडे पाठवून तात्काळ मंदिरास निधी मंजूर करून देण्यासह तीर्थक्षेत्राच्या शिफारीसाठी पात्र पाठविण्याचे सांगितले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी देवकर - रामराव बर्लेवाड, रामराव लुम्दे, दत्ता चितंलवाड, सरपंच गजानन कदम, पत्रकार सोपान बोम्पीलवार, परमेश्वर ढाणके, ज्ञानेश्वर चितंलवाड, दत्ता गुफंलवाड, नाना ढाणके, परमेश्वर इटेवाड, संजय इटेवाड, नागेश घोणसेटवाड, गोरख एटलेवाड, शाम लुम्दे,बाबुराव आचमवाड, शंकर मोरे, गजानन एटलेवाड, पिपरीकर, सिबदरेकर यांच्या सह कारला कृष्ण मंदिर कमिटी व गोपाळ महिला- पुरुष मंडळी उपस्थित होती.