मुक्या पक्षांना मूठभर धान्य ओंजळभर पाणी -NNL

येवती येथील श्री शिवाजी विद्यालयाचा उपक्रम


मुखेड, दादाराव आगलावे|
वाढत्या उन्हाची तिव्रता लक्षात घेता मुक्या  पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी मुठभर धान्य ओंजळ भर पाणी याप्रमाणे येवतीच्या श्री शिवाजी विद्यायलात उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांच्या संकल्पनेतुन व मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने व सर्व शिक्षकांच्या सहकार्यांने  विद्यालयातील प्रत्येक झाडाला पक्ष्यांसाठी खास तयार करुन घेतलेल्या मातीच्या वटक्यात व प्लास्टिकचे कँन कापुन केलेल्या पात्रात पाणी ठेवण्यात आले. 

या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये प्राणीमात्रांबद्दल प्रेम ,जैवविविधतेचे महत्त्व कळावे येवढेच नव्हे तर संत तुकाराम महाराजांनी त्याच्या अभंगातून भुतदया सांगीतली त्यांनी निसर्ग, प्राणी, पक्षी यांची जपवणूक करण्याचा सल्ला आपल्या अभंगातून दिला.म्हणून कोणताही जिव अन्न पाण्यावाचुन मरु नये व विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या पक्ष्यांची निरिक्षणे व्हावी जैवविविधता टिकून राहावी हाच या उपक्रमा चा हेतू. 


या आनंदायी उपक्रमात मध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार, हावगी पवाडे, रविंद्र तंगावार, प्रणिता मठ्ठमवार, कार्तिक स्वामी,विद्या भोपाळे, नंदकिशोर गव्हाणे, राजाराम गवलवाड, संतोष तळेगावे आदी शिक्षक  ,इतर कर्मचारी व विद्यार्थींनी सहभाग नोंदवला. उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी