येथील पंतप्रधान घरकुल योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी घरकुल न मिळाल्याने प्रतीक्षेत होते. हिमायतनगर नगरपंचायतीत गेल्या अडीच वर्षात ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्या नाकर्तेपणामुळे घेण्यात आलेले अर्ज नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडून होते. हि बाब लक्षात आल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद आणि त्यांच्या सहकार्यांनी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
आणि तात्काळ कुशाग्र असोशिएशन एजन्सीला मुदत वाढ मिळावी व नवीन लाभार्थ्यांचे अर्ज घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून निवेदन दिले होते. याची तात्काळ दखल आ.माधवराव पाटील जवळगावकर घेऊन प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकारी याना दूरध्वनीवरून सूचना देऊन कुशाग्र एजन्सीला मुदतवाढ देऊन नवीन घरकुलासाठी लाभार्थ्यांचे अर्ज घेण्यासाठी ८ ते १० दिवसाची मुदत मिळून दिली होती.
त्यानंतर शहरातील दुसऱ्या टप्प्यातील वंचित लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण डीपीआर तयार करून तात्काळ मंजुरीसाठी स्वतः आ जवळगावकर यांनी मुंबई येथे म्हाडाचे कार्यालय आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन तात्काळ घरकुलास मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेला आणि धूळखात पडलेल्या प्रस्तावाला आणि नव्याने दाखल केलेल्या अर्जास मंजुरी मिळाली. त्यामुळे शासनाकडून मंजूर झालेल्या 947 घरकुल धारकाच्या प्रश्न निकाली निघाल्याचा आनंद घरकुलापाउसन वंचित असल्यानं झाला आहे.