नांदेड। नांदेड शेजारीच असलेल्या मरळक या गावातील प्राचिन शिवमंदीरातील पुजारी मल्लिकार्जून विमलेश्वर स्वामी हे मंगळवारी रात्री शिवमंदीरातून पुजा करून शेजारीच असलेल्या मारोती मंदीरात नैवद्य दाखविण्यासाठी गेले.
मंदीराबाहेर गुंड प्रवृत्तीचा असनारा पांडुरंग कदम याने दारूच्या नशेत पुजारी मल्लिकार्जून स्वामी यास जातीवाचक शिवीगाळ करायला सुरू केले. पुजार्याने हात जोडून शिवीगाळ करू नका अशी विणंती केली परंतू आरोपीने इथेच न थांबता पायातील बुटाने मारहान करायला सुरू केले. तेवढ्यावरच न थांबता आपल्या मुलास आदीनाथ कदम यास फोन करून बांबुची काठी घेऊन ये असे सांगितले नंतर दोघांनी मिळून बेदम मारहान केली.
दोघांच्या अचानक मारहानीमुळे पुजारी मल्लिकार्जून स्वामी हे जाग्यावरच पडले. वरून दोघांना लाथा बुक्याने मारायला सुरवात केली स्वामींनी आरडाओरडा करायला सुरू केल्यानंतर शेजारील लोक धावत येऊन स्वामीला सोडवीले.
हे दोघेही गुंड प्रवृतीचे असून अनेकदा गावातील सामान्य लोकांना त्रास देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असतात. मल्लिकार्जून स्वामी यांचा काहीही दोष नसताना विनाकारण वाद घालून मारहान केली व स्वामीच्या घरी जाऊन बायकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
फिर्यादी स्वामींनी लिंबगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, भारतीय दंड संहिता अधिनीयम अन्वये 324, 323, 294, 506,34 अश्या प्रकारे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास लिंबगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत पवार करत आहेत.