नांदेड| जिल्ह्यातील सर्व गावांचे गावठाण भुमापन व गावठाणातील मालमत्तांचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करून गावठाणातील प्रत्येक घरांचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा परिपूर्ण नकाशा तयार व्हावा या उद्देशाने स्वामित्व योजना शासनाने हाती घेतली आहे.याचबरोबर असंख्य कुटुंबाजवळ जी मिळकत आहे त्याची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 तरतुदीनुसार मिळकत पत्रिका अर्थात आपल्या जागेची कायदेशीर प्रतिपूर्ती करणारीसनद नागरिकांना उपलब्ध होत आहे.
ड्रोन द्वारे सर्व्हे ऑफ इंडियामार्फत गावठाणातील मिळकतीचेहे सर्वेक्षण असल्याने याला अधिक महत्त्व आहे. याचबरोबर सदर इमेज जीओ संदर्भ असल्याने ती पडताळून गावठाणातील मिळकतीचा डिजिटल नकाशा असल्याने या सनदीला कायदेशीर आधार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांनी सनदी साठी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील स्वामित्व योजनाप्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
आज 23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामित्व योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती सुरेखा सेठिया, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वामित्व योजनेसाठी गावठाणातील जागांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून जागेबाबत परिपूर्ण अशी माहिती संकलितकेली जात आहे. ती भूमी अभिलेख कार्यालयामार्फत प्रत्यक्ष जागेवर पडताळूनही पाहिल्या जाते. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक गावठाण / ग्रामपंचायत निहाय नमूना 8 नुसार पडताळणी केली जाते. असंख्य गावात अद्यापही नमूना 8 अपडेट नसून त्याबाबत योग्य तीदक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.सदर सनद साठी शासनाने नाममात्र शूल्क दिले असून लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनीस्पष्ट केले. भूमिअभिलेख कार्यालयाच्या अधिक्षक श्रीमती सेठिया यांनी या बैठकीत सविस्तर विवेचन केले.