‘स्वारातीम’ विद्यापीठातील पंधरा विद्यार्थी गणितामध्ये सेट (SET) उतीर्ण -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलातील अकरा विद्यार्थी गणितामध्ये तर चार विद्यार्थी संख्याशास्त्रमध्ये असे एकूण पंधरा विद्यार्थी गणितीयशास्त्र संकुलामधून सेट (SET) उतीर्ण झाले आहेत.  

प्राध्यापक होण्यासाठी सेट (SET) परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये  गणितासारख्या अवघड विषयाची परीक्षा पास होणे म्हणजे अतिशय कठीण परिश्रम घेणे होय. याशिवाय कोरोना सारखे जागतिक संकट प्रत्येकावर आलेले असतांना त्यामधूनही या पंधरा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादित केले. 

गणितामध्ये सेट (SET) उतीर्ण झालेले विद्यार्थी आदित्य लगड, अशोक निरडे, शुभम बिबेकर, सतीश ठाकरे, मयूर पाटील, हबीब गौहर, उज्मा बेगम, अंजली वलेकर, गीता सूर्यवंशी, सोनाबाई पाटील, अंकुश चिद्रावार हे आहेत. तर संख्याशास्त्रमध्ये उतीर्ण विद्यार्थ्यामध्ये विजय पाटील, शितल निकम, अश्विनी वाळके व आनंदा पोवार हे आहेत. विशेष म्हणजे आदित्य लगड हा विद्यार्थी पदव्युत्तर पदवी होण्याआधीच उतीर्ण झाला आहे. 

संकुलातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्र्सिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, संकुलाचे संचालक डॉ. डी.डी. पवार, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उषा सांगळे, डॉ. अनिकेत मुळे, प्रा. उदय दिव्यवीर, डॉ. सुरेंद्रनाथ रेडडी, डॉ. रुपाली जैन यांच्यासह  संकुलातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी