उस्माननगर। थोर महापुरुषांच्या विचाराची समाजाला गरज असून समाजातील सुशिक्षित तरुणांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी वेळ दिला. तर सुनिल जोंधळे सारखे तरुण अधिकारी होता येते असे प्रतिपादन उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि ज्ञानोबा देवकते यांनी केले.
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहामध्ये उस्माननगर पोलिस स्टेशनला काही महीन्यापूर्वी सपोनि म्हणून लाभलेले श्री.ज्ञानोबा देवकते यांना पोलीस निरीक्षक म्हणून तर पोलिस स्टेशनला तीन वर्षांपासून स.पो.उपनिरिक्षक म्हणून लाभलेले बाबासाहेब थोरे यांना सुध्दा सपोनि म्हणून पदोन्नती मिळाल्या बद्दल व गुळखंड ता. पालम जि.परभणी येथील रहीवाशी आणि सध्या मुंबई येथे केंद्रीय अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील काशीराम जोधळे.
येथील देशोन्नतीचे पत्रकार अमजद पठाण यांची कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व येथील पोलीस पाटील विश्वाभंर मोरे यांची न्यू.महाराष्ट्रा कामगार संघटना पोलिस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि ज्ञानोबा देवकते हे होते.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पमाला घालून सत्कार करण्यात आला.
" ऐसा गोडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा" या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, करून यशस्वी व्हावे.आकाश, धरती, पाताळ या ठिकाणी मुलांचे नाव झळकले पाहीजे.मुलांनी खुप शिकवून स्पर्धांमध्ये सहभागी घेवून यश मिळवून गावाचे व परिवाराचे नाव झळकले पाहीजे.संपतीच्या मागे न लागता संतती घडविण्याकडे लक्ष द्यावे.आई वडीलांनी खुप कष्ट केले म्हणून संतती ही सुनिल जोंधळे यांच्या रुपाने संपत्ती आपल्या पुढे आहे. असे प्रतिपादन यावेळी सपोनि ज्ञानोबा देवकते यांनी केले.
यावेळी सुनिल जोंधळे म्हणाले की, जिद्द, चिकाटी, आणि मेहनतीच्या बळावर कोणत्याही स्पार्धापरिक्षा असतील त्या पार करू शकतो.मनामध्ये जिद्द आसेलतर ध्येय पूर्ण करु शकतो, असे प्रतिपादन यावेळी केले.सपोउनि थोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश लोखंडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुर्यकांत मालीपाटील यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक काशीराम जोधळे, रोहीदास कांबळे , शिवशंकर काळे, रामदास घोरबांड, प्रदीप देशमुख,संभाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे, माणिक भिसे यांच्यसह नागरीक उपस्थित होते.