शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी जाधव उपाध्यक्ष सौ.खोकले यांची निवड -NNL

शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी येथील जि.प. प्रार्थमिक शाळा शिवणी या ठिकाणी शासकिय नियमानुसार शैक्षणिक वर्ष २०२२ ते  २०२४ या कालावधीसाठी नवनियुक्त अशी शालेय व्यवस्थापन समितीची खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद केंद्रीय प्रार्थमिक शाळा शिवणी येथील मुख्याध्यापक बी.एल. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरूवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सदर शालेय व्यवस्थापण समितीचे पुनर्गठन करण्यासाठी बैठक घेण्यात आली.यात शालेय व्यवस्थापण समितीने नवनियुक्त अध्यक्ष म्हणून संतोष जाधव तर उपाध्यक्ष सौ.संगिता खोकले यांची सर्वानुमते निवड करण्यात आले.या बैठकीसाठी शिवणी गावातील ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी प्रथम सर्व उपस्थित पालकांचे व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक बी.एल. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक ज्ञानोबा तरटे सर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची प्रकिया व विध्यार्थी संख्येनुसार आरक्षणाची सोडत समजावुन सांगितली व त्यानुसार सर्व उपस्थित पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहमतीने सदस्यांची निवड करण्यात आली.यामध्ये सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष दत्तराम जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.संगीता खंडुजी खोकले यांची व सचिवपदी बी.एल.चव्हाण यांची निवड झाली तसेच सदस्य म्हणून बाबू मुद्दलवाड, विजय राठोड विनायक लोहगावकर, लक्ष्मीबाई गोपनवाड,दत्ता झळके, विजया शिंदे,कमल ईबीतवार, जयवंत आमले, गंगाचरण मज्जरवाड,दीपा चेपूरवार, दत्ता चव्हाण,संजय मेडपल्लीवर,ललिता गाडेकर, लक्ष्मीबाई औनुरवार व शिक्षक प्रतिनिधी म्हणून डी. ई.पांचाळ यांची निवड झाली.

ग्रामपंचायत नियुक्त सदस्य व  शिक्षणप्रेमी नियुक्त सदस्य पहिल्या बैठकीत निवड करण्याचे ठरविले असून या निवडीच्या वेळीस शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भोजराज देशमुख, हणमंतु बेहरे,विद्याबाई जयस्वाल,अनिता जिंके, रामचंद्र खंडेलवाड,लक्ष्मण राठोड,जनार्धन ढाकारे,विठ्ठल शिंदे,आश्रफ अली, साईनाथ लिंगपूजे, नागनाथ औनुरवार, दत्ता झळके, राजेश्वर गड्डमवाड,गणेश अचकूलवार, रमेश मैदेवाड, राजेश्वर घोगुरवाड,काशीनाथ डाके, देवराव मेंढे,शिवाजी बेले, शिवाजी डाकोरे सह अनेक पालक व ग्रामस्थ मोठया सख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्र प्रमुख एन.पी.पांचाळ सह मराठी पत्रकार परिषद चे तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड उपस्थित होते.तर जि.प.कें.प्रा.शाळेचे श्रीमती कविता फोले,एम.यु. उप्पलवार, बि.डी. राठोड,व्ही. आर कोकणे,जी.जी. तरटे,एस.ई जाधव, टी.एच. सय्यद,आर.एस.चव्हाण,एस.एस.गवळी,जे.बी.मलगे, एस.एस.पांचाळ आदी उपस्थित होते.सदर समिती निवडीचे अध्यक्ष संतोष जाधव व उपाध्यक्ष संगीता खोकले सह सर्व सदस्यांचे केंद्रीय प्राथमिक शाळे कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.                                                      

या निवडी बद्दल नूतन अध्यक्ष संतोष जाधव म्हणाले कि,मागील समिती मध्ये मी सदस्य म्हणून होतो समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य सह श्री गोपाळराव गायकवाड सर आणि शिक्षकवृंद व अनेकांनी शाळेचा व विध्यार्थ्यांचा बौद्धिक  विकासासाठी अनेक कामे आम्ही सर्वांनी मिळून केलोत.या पुढे ही शाळेत कोणत्याच प्रकारचे राजकारण न आणता ही शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न मी आवश्य करीन व सर्व सन्मानीय सदस्यांनी  अध्यक्ष पदासाठी माझी निवड केल्या बद्दल सर्वांचे मनस्वी आभार.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी