हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी आता हिंदु समाजाने संघटनशक्ती दाखवावी - श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना -NNL

‘कधी थांबणार हिंदू वंशसंहार ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद संपन्न !


मुंबई|
देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा सुरु असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त श्री. हर्षा या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. श्री. हर्षा यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ इंडिया’ (SDFI) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या कट्टर इस्लामी संघटनांचा हात आहे. यामध्ये सहा मुसलमानांन अटक केली आहे. श्री. हर्षाप्रमाणेच अनेक हिंदूंच्या अशाप्रकारे हत्या होत आहेत. या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवायला हवी, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘कधी थांबणार हिंदू वंशसंहार ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

यावेळी तमिळनाडु येथील ‘हिंदु मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ म्हणाले की, तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांत अनेक हिंदु कार्यकर्ते आम्ही गमावले आहेत. हिंदूंच्या हत्यांमागे कार्यरत जिहादी इस्लामी संघटनांवर बंदी आणली पाहिजे. भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची गरज आहे.

या संवादात सहभागी झालेले पश्‍चिम बंगाल येथील ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी म्हणाले की, हिंदूंच्या हत्या झाल्यावर हिंदु मोठ्या प्रमाणात एकत्रित होत नाहीत. दिवसेंदिवस हिंदूंच्या हत्या देशातील सर्वच राज्यांत होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे.

कर्नाटक येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. म्हणाले की, सतत जागृत हिंदूंच्या हत्या करुन आपल्या देशात हिंदूंमध्ये भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. तथाकथित मानवधिकारवाले हिंदूंच्या हत्यांवर मौन बाळगून आहेत. ‘सेक्युलरिझम’च्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द कायमचा मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत; मात्र आता हिंदू हे सहन करणार नाहीत.

हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा या वेळी म्हणाले की, कर्नाटकसह पूर्ण भारतात धर्मांध शक्तींचा प्रभाव वाढत आहे. नुकतीच कर्नाटकमध्ये धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ता श्री. हर्षा यांची हत्या केली. श्री. हर्षा यांच्या हत्येतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या; मात्र ज्या प्रमाणात हिंदूंनी याविरोधात आवाज उठवायला हवा होता, तो उठवला गेला नाही. हिंदूंनी आता या विरोधात आवाज उठवून जागृती करण्याची आवश्यकता आहे.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.संपर्क : 9987966666

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी