नांदेड| येत्या दिनांक 28 /2 /2022 दिवस सोमवारी नांदेड येथे सर्व जुनाट आजार मुक्त विनामूल्य शिबिराचे आयोजन दहा ते पाच दरम्यान करण्यात आले आहे. हे एक दिवसीय शिबीर फक्त मर्यादित पूर्व नोंदणीकृत रुग्णासाठी आहे.
या शिबिरात दिल्ली व जॉर्जिया (युरोप) येथील नामवंत, डॉ.अरविंद कुमार ठाकूर व डॉ.सिद्धांत ठाकूर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक जुनाट आजार जसे अलर्जी, संधिवात, मधुमेह, अस्थमा, रक्तक्षय, थायराइड, मूळव्याध, यकृत, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून रोग मुक्त केलेले आहे. अशी त्यांची ख्याती आहे.
तेव्हा इच्छुकांनी व गरजूंनी या शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ.हंसराज वैद्य (9423138385), डॉ.शीतल भालके(9422189274), डॉ.सीमा राठोड(9834740485) यांनी केले आहे. शिबिराचे स्थळ: वैद्य रुग्णालय एसपी ऑफीस समोर वजीराबाद नांदेड. दि.28 फेबु्रवारी 2022 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यत असेल याची नोंद घ्यावी.