किनवट तालुक्याचे ४ विद्यार्थी हे युक्रेन येथे अडकल्याची माहिती -NNL


किनवट|
रशिया आणी युक्रेनच्या युध्दाच्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्ह्यातील २० तर किनवट तालुक्याचे ४ विद्यार्थी हे युक्रेन येथे अडकल्याची माहिती प्राप्त होत आहे तर हे विद्यार्थी येथे शिक्षणाच्या दृष्टीने गेलेले आहेत. स्वस्त वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रचलित असलेल्या युक्रेन या देशावर युध्दाचे संकट आल्याने येथिल भारतीय विद्यार्थ्यांचे पालक कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. 

किनवटचे माजी उपनगराध्यक्ष राघवेंद्र जयस्वाल यांचे चिरंजिव डॉ शिवम राघवेंद्र जैस्वाल व बोधडी येथिल प्रतिष्ठीत नागरीक डॉ मारोती कराड यांचे चिरंजिव डॉ रोहित कराड बोधडी व डॉ जयश उमेश पाटील, डॉ प्रणव राजेंद्र लोंढे असे ४ वैद्यकिय शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे अड्कले आहेत. तर हे मायदेशी परत यावे.

याकरिता किनवट तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागारीकांनी प्रयत्न केले असुन या करिता आ. भिमराव केराम, माजी आमदार प्रदिप नाईक, ता. अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, ता. अध्यक्ष संदिप केंद्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस चे गजानन मुंडे पाटील, पोलिस कर्मचारी सय्यद सिराज, रा.कॉ. कचरू जोशी यांनी प्रशासना सोबत समन्वय साधले असुन पालकांना धीर दिला आहे. तर परदेशी असलेले किनवट चे विद्यार्थी लवकरच मायदेशी आगमन होईल असा विश्वास तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांनी व्यक्त केला आहे तर नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या सुचने नुसार किनवट तहसिल कार्यालयात कंट्रोल रुम स्थापन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी