पोखरभोसी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची निवड - NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी येथील जि.प.प्रा.शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक कार्यकारणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष म्हणून श्री कैलास रामराव ताटे पाटील तर उपाध्यक्ष पदी सौ.शिवनंदा दयानंद ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जि.प.प्रा.शाळा पोखरभोसी ता.लोहा येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून या शाळेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणीसाठी दि.२२ फेब्रुवारी रोजी नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलाविण्यात आले होते. 

यावेळी प्रत्येक वर्गातून एक एक पालक घेण्यात आले यामध्ये 50 टक्के महिलांना प्राधान्य देण्यात आले. शाळेत पारपडलेल्या निवडणुक दरम्यान पालकातुन निवडलेल्या सदस्यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. 

या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री कैलास रामराव ताटे, उपाध्यक्ष म्हणून सौ. शिवनंदा दयानंद ताटे, शिक्षणप्रेमी श्री विक्रम बालासाहेब डांगे, स्थानिक स्वराज्य प्रतिनिधी तथा उपसरपंच फुलाजी नारायण ताटे, या समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री हरि नारायण मुळे तर सदस्य म्हणून सौ. सुरेखा श्रीनिवास ताटे, भगवान दिनाजी ताटे, सौ. गोपिका गजानन डांगे, सौ. अंजना सदाबुवा गिरी, श्री गोविंद व्यंकटराव भावे, सौ. महानंदा बालाजी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नूतन कार्यकारणी समितीने शाळेच्या विविध विकासकामासाठी  व दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले . शाळेचे मुख्याध्यापक श्री हरी मुळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी