माता सावित्रीच्या प्रतीमेस अभिवादन करून जमसंने साजरा केला हळदी कुंकूवाचा कार्यक्रम -NNL

नांदेड। पारंपारिक हळदी कुंकू कार्यक्रमाला छेद देत शहरातील अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या युनिट ने माता सावित्रीच्या प्रतीमेस हार घालून ओक्षण करून अभिवादन करीत हळदी कुंकूवाचा कार्यक्रम बजरंग कॉलनी येथे साजरा केला आहे.

जमसंच्या नांदेड जिल्हा कमिटीच्या पदाधिकारी कॉ.लता गायकवाड यांच्या निवास स्थानी दि.३१ जानेवारी रोजी हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्राती पासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केले जाते.हळदी कुंकू लावणे ही प्रथा फार जुनी असून असून महिलांशी निगडीत आहे.भारतीय समाजात व महाराष्ट्रात या सनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बहुतांशी ठिकाणी या सनाला धार्मिक,पारंपारिक व आधुनिकतेची झालर चढली असली तरी त्यास छेद देत माता सावित्री फुले यांच्या प्रतीमेस अभिवादन करून नांदेड शहरातील जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेतला आहे.सदरील कार्यक्रमामध्ये कॉ.लता गायकवाड,सावित्री गालफाडे,सीमा भालेराव,मीनाबाई रणखांबे,प्रेमाताई वाघमारे,दिपीका भिसे,नेमाबाई कंधारे,मनिषा भिसे,वर्षा वाघमारे,छायाबाई कंधारे,अश्विनी दरोडे,स्मिता कंधारे, छाया आंबटवार आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी