नांदेड| जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक युवाराज्य व आझाद ग्रुपच्यावतीने गौरव जिजाऊ सावित्रीच्या लेकीचा या उत्सवामध्ये त्यांच्या कार्याविषयी आधारित लेख प्रकाशित करण्यात आले. त्या कर्तृत्ववान माता-भगिनींना जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालीकेच्या महापौर जयश्रीताई पावडे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर, नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी मुख्याधिकारी रेखाताई कदम, नांदेडचे ज्येष्ठ साहित्यीक तथा बालरोग तज्ञ डॉ.हंसराज वैद्य, ज्येष्ठ सहित्यीक देविदास फुलारी यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते डॉ.शितल भालके यांना जिजाऊ सावित्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
त्या प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्त्या, राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज नांदेडच्या अध्यक्षा तसेच कृषी कन्या आहेत. महिलांचे संघटन करण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्या विपरीत परिस्थितीत धैर्याने काम करणार्या असून त्यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. हा कार्यक्रम नांदेड शहरातील एमजीएम जवळ नमस्कार चौक येथे असलेल्या हॉटेल गणराज पॅलेस येथे संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम दि.20 फेबु्रवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजीत करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक आझाद गु्रपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे व दैनिक युवाराज्यचे आवृत्ती संपादक तथा एकलव्य निवासी हॉस्टेलचे संचालक प्रा.गणेश शिंदे यांनी केले आहे. जिजाऊ सावित्री रत्न पुरस्कार डॉ.शीलत भालके यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.