नांदेड| त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त तरोडा बु. येथील पंचशील बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात देगाव चाळीच्या कु. अवंतिका कदम या चिमुकलीच्या अभिनयाने 'मी रमाई बोलतेय' ही एकपात्री एकांकिका चांगलीच रंगली. हुबेहूब रमाई साकारुन उपस्थित महिलांना अंतर्मुख केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष तथा स्तंभलेखक शंकर गच्चे हे उपस्थित होते. काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, कवी थोरात बंधू, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, भीमराव कदम, सुभाष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर संयोजन समितीचे भगवान सावंत, केशव धुतडे, गौतम सावंत, माधव ढवळे आदींची उपस्थिती होती.
माघ पौर्णिमेनिमित्त सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने ५२ व्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप, धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना भीमस्तुती गाथापठणानंतर देगाव चाळ येथील कु. अवंतिका कदम हिने 'मी रमाई बोलतेय' ही एकांकिका सादर केली. काव्यपौर्णिमेत थोरात बंधू, नागोराव डोंगरे, सुभाष लोखंडे, प्रज्ञाधर ढवळे, सुभाष लोखंडे, भीमराव कदम, शंकर गच्चे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन नागोराव डोंगरे यांनी केले तर भगवान सावंत यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला तरोडा बु. मूळ गाव येथील महिलांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. लेखक शंकर गच्चे यांनी रमाईच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून अध्यक्षीय समारोप केला. काव्य पौर्णिमा मालेतील ५२ व्या काव्य पौर्णिमेच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई धुतडे, वंदना ढवळे, शकुंतला जाधव, वैष्णवी ढवळे, वर्षा ढवळे, सुप्रिया ढवळे, प्रेमला सावंत, शांताबाई सावंत, जिजाबाई सावंत, सविता ढवळे, श्रेया सावंत, सम्यका सावंत, जान्हवी सावंत, सुनिता भिसे, प्रिती सावंत, शितल सावंत, शोभा ढवळे, प्रफुल्ल सावंत, सुशांत सावंत, विश्वजीत सावंत, त्रिरत्न सावंत, सुमेध सावंत, माधव ढवळे, भगवान सावंत, केशव धुतडे, गौतम सावंत यांनी परिश्रम घेतले. सरणत्तय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.