खा चिखलीकर यांच्याकडून कापुरे गुरुजी परिवाराचे सांत्वन -NNL


लोहा|
जिल्हा परिषदेत विविध समितीचे सभापती असताना पासून सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम आर कापुरे गुरुजी यांनी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शना खाली काम केले होते. त्यांचे निधन झाले. त्याच्या निवास स्थानी प्रतापराव पाटील यांनी भेट दिली त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व धीर दिला.

एम आर कापुरे गुरुजी यांचे आंबेडकरी चळवळीतील मोठे योगदान राहिले आहे. हाडाचे शिक्षक अशी त्यांची ओळख होती.ते शिक्षक संघटनेत सक्रिय होते.त्यांच्या निधना नंतर जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  कापुरे गुरुजींच्या निवासस्थानी भेट दिली.पत्नी सुनंदाबाई कापुरे चिरंजीव बापूसाहेब कापुरे, महेंद्र कापुरे यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला. कापुरे गुरुजींच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, प स उपसभापती नरेंद्र गायकवाड, नगरसेवक दता वाले, सरपंच मंगेश पाटील, रत्नाकर महाबळे, अनिल धुतमल, प्रवीण धुतमल , वारकरे यासह नातेवाईक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शिक्षण परिषदेत श्रद्धांजली - 
लोहा शहरातील जि प केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच लोहा या शाळेत आयोजित केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत एम आर कापुरे गुरुजी याना विविध शिक्षक संघटनेच्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शिवछत्रपती विद्यालय, आश्रम शाळा येथेही त्यांना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच जिज्ञासा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र , पत्रकार संघाच्या वतीने एम आर कापुरे गुरुजींना अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी